विडी व यंत्रमाग कामगारांच्या लसीकरणासाठी विशेष मोही घ्या - आ.विजयकुमार देशमुख
सोलापुर - सोलापुर शहरामध्ये लसीकरण हे धिम्यागतीने सुरू असून यामध्ये कामगार वर्गाला कमी प्रमाणात लस मिळत आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार विडी यंत्रमाग कामगारांकडे लस किंवा रॅट, आर्टिपीसीआर याचे निगेटिव्ह असल्याचे प्रमाणात असणे बंधनकारक केलेले आहे अन्यथा कामगारांवर कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आलेला आहे . अश्या परिस्थित कामगारांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. आज आ.विजयकुमार देशमुख यांनी नवी पेठे येथील संपर्क कार्यालयामध्ये महापौर, आयुक्त, सभागृहनेते विडी उद्योग समूहाचे अध्यक्ष, सचिव यांच्यासमवेत बैठक घेतली. विडी व यंत्रमाग कामगारांसाठी विशेष मोहिम घेऊन त्यांना लस द्यावी. शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे आ.विजयकुमार देशमुख यांनी केली.
सोलापुर शहराला जास्तीतजास्त लसींचा साठा उपलब्ध करून घ्यावा. आठवड्यामधील एक दिवस विडी व यंत्रमाग कामगारांना लस द्यावी अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्तांकडे बैठकीदरम्यान केली.
आधीच लॉकडाऊन मुळे विडी व यंत्रमाग कामगार हे अडचणीत आलेले आहेत. आयुक्तांनी घातलेल्या निर्बंधांमुळे हातावरचे पोट असणाऱ्या विडी व यंत्रमाग कामगरांना घरी बसावे लागत आहे त्यामुळे आयुक्तांनी लसीकरणासाठी लवकरात लवकर विशेष मोहीम घ्यावी. अशी मागणी सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी केली.
येत्या दोन ते तीन दिवसात लसींचा साठा जास्त प्रमाणात कसा उपलब्ध होईल याचा प्रयन्त करन विशेष मोहीम घेऊयात असे आयुक्तांनी सांगितले
याप्रसंगी माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी.शिवशंकर, सभागृहनेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, नगरसेवक विनायक विटकर, विडी उद्योग संघाचे अध्यक्ष सुनील क्षत्रिय, सचिव बाळासाहेब जगदाळे, ओमशेठ तिवाडी, आदीजन उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा