भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी झाली आहे : प्रकाश वाले
भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी झाली आहे : प्रकाश वाले सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर व खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध सोलापूर:- दिनांक 8 जुलै 2021 केंद्रातील भारतीय जनता पार्टी चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस खाद्यतेलाचा सह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले व जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथून सायकल रॅली काढण्यात आली. रंगभवन मार्गे डफरीन चौक मार्गे नवल पेट्रोलपंप येथे सायकल रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीत बैलगाडीवर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष...