पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी झाली आहे : प्रकाश वाले

इमेज
  भारतीय जनता पार्टी ही आजची भारतीय जनतेचा पैसा लुटणारी पार्टी झाली आहे : प्रकाश वाले सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर व खाद्यतेलाच्या दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध सोलापूर:- दिनांक 8 जुलै 2021 केंद्रातील भारतीय जनता पार्टी चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल एलपीजी गॅस खाद्यतेलाचा सह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले व जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी कॉंग्रेस भवन सोलापूर येथून सायकल रॅली काढण्यात आली. रंगभवन मार्गे डफरीन चौक मार्गे नवल पेट्रोलपंप येथे सायकल रॅली विसर्जित करण्यात आली. या रॅलीत बैलगाडीवर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हा अध्यक्ष...

विडी व यंत्रमाग कामगारांच्या लसीकरणासाठी विशेष मोही घ्या - आ.विजयकुमार देशमुख

इमेज
सोलापुर - सोलापुर शहरामध्ये लसीकरण हे धिम्यागतीने सुरू असून यामध्ये कामगार वर्गाला कमी प्रमाणात लस मिळत आहे. महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार विडी   यंत्रमाग कामगारांकडे लस किंवा रॅट, आर्टिपीसीआर याचे निगेटिव्ह असल्याचे प्रमाणात असणे बंधनकारक केलेले आहे अन्यथा कामगारांवर कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आलेला आहे . अश्या परिस्थित कामगारांनी जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. आज आ.विजयकुमार देशमुख यांनी नवी पेठे येथील संपर्क कार्यालयामध्ये महापौर, आयुक्त, सभागृहनेते विडी उद्योग समूहाचे अध्यक्ष, सचिव यांच्यासमवेत बैठक घेतली. विडी व यंत्रमाग कामगारांसाठी विशेष मोहिम घेऊन त्यांना लस द्यावी. शहराला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घ्याव्यात अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे आ.विजयकुमार देशमुख यांनी केली. सोलापुर शहराला जास्तीतजास्त लसींचा साठा उपलब्ध करून घ्यावा. आठवड्यामधील एक दिवस विडी व यंत्रमाग कामगारांना लस द्यावी अशी मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आयुक्तांकडे बैठकीदरम्यान केली. आधीच लॉकडाऊन मुळे विडी व यंत्रमाग कामगार हे अडचणीत आलेले आहेत. आयुक...